शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भांडण मिटविल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:42 IST

दोन व्यक्तीतील भांडण का मिटविले? याचा राग धरून दोन गटात दगड, लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकास तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ घडली. यात चार जण जखमी झाले आहेत.

कोपरगाव : दोन व्यक्तीतील भांडण का मिटविले? याचा राग धरून दोन गटात दगड, लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकास तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ घडली. यात चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी रात्री उशिरा परस्पर विरोधी फिर्यादीवरुन ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वसिम युसुफ शेख ( रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मी घरात असताना अजीज कासम कुरेशी, शकील मेहबूब शेख, सोफियान सलीम कुरेशी, अकिल बशीर शेख, मुन्ना राजू कुरेशी, अफान मुस्ताक शेख ( सर्व रा.आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी घरात येऊन दुपारी अजीम कुरेशी व इस्माईल कुरेशी यांच्यातील भांडण का मिटविले? असे म्हणून मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अजिज कुरेशी याने माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. तर अजीज कासम कुरेशी (रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मी आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ असताना वसिम युसुफ शेख, शकील इस्माईल कुरेशी, जावेद युसुफ शेख (सर्व रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव) यांनी तेथे येऊन तू दुपारी इस्माईल कुरेशी यास का मारले? असे म्हणून म्हणून मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वासिम शेख याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी