शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

कामरगावात संतप्त गावक-यांच्या हल्ल्यात बिबट्या ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:02 IST

आठवड्यापासून गावात बिबट्या धुमाकूळ घालत असतानाही वनविभागाने पिंजरा न लावल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला मारले

केडगाव : नगर - पुणे रस्त्यालगत असणा-या कामरगाव ( ता. नगर )  येथे आज बिबट्याने तब्बल सहा तास धूमाकूळ घालत महिलेसह दोघांवर हल्ला केला. दरम्यान गावातील एका बहादराने थेट बिबट्याला झडप घालत पकडण्याचे धाडस केले. यावेळी संतप्त गावक-यांनी केलेल्या झटापटीत बिबट्या ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नगर तालुक्यातील कामरगाव येथे  गुरुवार (दि.२०) दुपारी १ च्या दरम्यान  गावातील  महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ठोकळ वस्ती येथे घडली. या हल्ल्यात शालिनी सुरेश ठोकळ (वय-३२) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. ठोकळ वस्ती परिसरात शालिनी ठोकळ व रोहिणी संतोष कदम या दोन महिला शेतात चालल्या होत्या. यावेळी बिबट्याने शालिनी ठोकळ यांच्या अंगावर झेप घेतली. पाठिला व मानेला चावा घेतला. यावेळी रोहिणी कदम यांनी हातात दगडाने मारा केल्याने बिबट्याने धूम ठोकली व शेजारील असलेल्या ज्वारीच्या पिकात दडून बसला. या ठिकाणी बिबट्याचे दोन पिले ही आढळून आली आहेत. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचा-याने रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सीमा साठे यांचे पती गणेश साठे यांनी तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला गणेश साठे यांच्यासह मच्छिंद्र जाधव, दादा ठोकळ, सुनील कातोरे, तुकाराम कातोरे, सुरेश ठोकळ यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

गावात बिबटया आल्याची बातमी गावात पसरताच हजारोच्या संख्येने गावकरी गावात जमा झाले.  यामुळे नगर - पुणे मार्ग ठप्प झाला.  गावातील तान्हाजी माळी या गावक-याने बिबट्याचा शोध घेत त्यावर एकट्यानेच झडप घालण्याचे धाडस केले. त्यात माळी जखमी झाले. गावक-यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी बिबट्या व गावकरी यांच्यात झटापट होऊन बिबट्या मृत झाला. बिबट्या मृत झाल्याचे समजताच वनविभाग व पोलिस पथकाने गावात भेट दिली.

बिबट्या आराम करत असावा. त्याचवेळी तेथे मोठा जमाव आला. या बिबट्याच्या पोटाला मोठ्या जखमा आहेत. या जखमांमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. - भास्कर शिंदे,  वनपरिक्षेत्रपाल , नगर तालुका वन विभाग,

पिंजरा न आल्याने गावकरी संतापलेघटनेची माहिती मिळताच विभागाचे पथक दाखल झाले. परंतु, वनविभागाकडे पिंजरा उपलब्ध नसल्याने त्यांनी अळकुटी (ता.पारनेर) येथून पिंजरा आणावा लागेल असे सांगितले असता सरपंच पती गणेश साठे यांनी गावातील वाहन पिंजरा आणण्यासाठी अळकुटीला पाठविले. परंतु गावात पिंजरा येण्यापूर्वीच बिबट्या ठार झाला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय