शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी, मोठी जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:17 IST

डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला  वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्षांचा चिवचिवाट.... घामाघूम झालेले ग्रामस्थ.... सरपंचांनी घेतलेला पुढाकार.... आणि सर्वांच्याच अथक प्रयत्नांना आलेले यश. प्रसंग होता.. डोंगराच्या पायथ्याशी लागलेल्या आगीचा.

केडगाव  : डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला  वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्षांचा चिवचिवाट.... घामाघूम झालेले ग्रामस्थ.... सरपंचांनी घेतलेला पुढाकार.... आणि सर्वांच्याच अथक प्रयत्नांना आलेले यश. प्रसंग होता.. डोंगराच्या पायथ्याशी लागलेल्या आगीचा.

कामरगाव (ता. नगर) येथे मंगळवारी रात्री ८  वाजण्याच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटर अंतरावर काल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जानबाचा तलाव ते भैरवनाथ मंदिर दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून आग लागली. काही वेळातच सुमारे एक हजार मीटर परिघात आगीने रूद्ररूप धारण केले.  अंधार असतानाही त्या ठिकाणे  लख्ख प्रकाश दिसू लागला. ही बातमी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम कातोरे यांना समजली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यांनी गावातील २५ तरुणांना सोबत घेऊन घटना स्थळाकडे धाव घेतली.

प्रचंड उसळलेला आगडोंब पाहून जंगलातील हरीण, तरस, ससे, मोर, रानडुक्कर ई. प्राणी जीवाच्या आकांताने सैरभैर होऊन पळू लागली. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

 यावेळी गावातील तरुणांनी ओला बारदाना, झाडांच्या पानांचे ढगळे हाती घेऊन तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दोन ट्रॅक्टरांनी  आगीच्या पुढे खोल नांगरट केली. त्यामुळे आग विझवीण्यास आणखी मदत झाली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरforestजंगलfireआग