शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त; दोघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:13 IST

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील कासारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

संगमनेर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील कासारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले आहेत.    सागर उर्फ टायगर बर्डे, अरूण बर्डे (दोघेही रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना कासारा दुमाला शिवारातील प्रवरा नदीपात्रातलगत गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस हेड कॉँस्टेबल, वाहन चालक सुरेश गोलवड, पोलीस कॉँस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, साईनाथ तळेकर यांनी कारवाई केली.  यावेळी पोलिसांनी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे रसायन व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. पळून गेलेल्या दोघांची नावे चौकशी दरम्यान समोर आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप बोटे तपास करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी