शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक निकाल : भाजपचे शिर्डीतून राधाकृष्ण विखे तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर; कर्जत-जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 11:19 IST

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील तर संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार आघाडीवर आहेत. तर पालकमंत्री राम शिंदे जामखेडमधून तर पारनेरमधून सेनेचे विजय औटी, अकोलेतून वैभव पिचड पिछाडीवर आहेत. 

अहमदनगर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील तर संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार आघाडीवर आहेत. तर पालकमंत्री राम शिंदे जामखेडमधून तर पारनेरमधून सेनेचे विजय औटी, अकोलेतून वैभव पिचड पिछाडीवर आहेत. शिर्डी, संगमनेर, कर्जत-जामखेड, अकोले मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. शिर्डी मतदारसंघात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ३० हजार मतांनी आघाडीवर होते. तर संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे १२ हजार मतांनीआघाडीवर होते. कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अकोले मतदारसंघातून माजीमंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे हे १० हजार मतांनी आघाडीवर होते. पारनेरमधून शिवसेनेचे नेते विजय औटी हेही पिछाडीवर होते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेतली. शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे आघाडीवर आहेत. माजीमंत्री बबनराव ढाकणे यांचे ते चिरंजीव आहेत. कोपरगाव मतदारसंघातून आमदार स्रेहलता कोल्हे याही पिछाडीवर आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे आघाडीवर आहेत. आशुतोष काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आहेत. राहुरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे २३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019