शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Video: पुलीस साहेबांनी मला बाहेरच अडवलं, अण्णांना भेट न दिल्यानं घनश्यामला रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 19:17 IST

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत.

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या 7 दिवसांपासून राळेगणसिद्धी येते उपोषण सुरू आहे. या उपोषणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठींबा दर्शविल्यापासून इतरही राजकीय पक्षांनी आण्णांच्या भेटीसाठी रीघ लावली आहे. त्यातच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अण्णा हजारेंची भेट घेतली. तत्पूर्वी छोटा पुढारी धनश्याम दरोडेही अण्णांच्या भेटीला गेला होता. मात्र, पोलिसांनी घनश्यामला दारातच अडवले. त्यामुळे घनश्यामला रडू कोसळले. 

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल चार तासांपासून अण्णांशी चर्चा सुरु असून केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग बैठकीतून निघून गेले. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, या भूमिकेवर अण्णा ठाम आहेत. त्यामुळे केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग पाच वाजण्याच्या सुमारास बैठकितून निघून गेले. तत्पूर्वी छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दरोडेनेही राळेगणसिद्धीत हजेरी लावली होती. मी अण्णांचा शिष्य असून अण्णा माझे गुरू असल्याचं सांगत घनश्यामने राळेगणसिद्धीत भाषणही केले. मात्र, घनश्यामला अण्णांच्या भेटीसाठी जाऊ न दिल्याने तो नाराज झाला आहे. पोलीस साहेबांनी अण्णांची भेट घेऊ न दिल्याचे सांगताना घनश्यामला रडू कोसळले.    

मला अण्णांकड का जाऊन देत नाहीत, म्हणून मला रडायला येत होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला जागं करायच काम आम्ही करत आहोत. सरकारला माझं कळकळीच सांगण आहे, की अण्णांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे घनश्यामने म्हटले आहे. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhmednagarअहमदनगर