शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला कडाडला, डाळींनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:16 IST

अहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

सुदाम देशमुखअहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. पुणे, मुंबई परिसरात मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली. परिणामी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आणि दरवाढ झाली. डाळींच्या भावातही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच डाळी शंभरीपार गेल्या आहेत. पाऊस, डाळ मीलवर अद्याप कामगार येत नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

 

यंदा पावसामुळे उडिदाचे उत्पादन कमी झाल्याने आपोआप तेजी निर्माण झाली असल्याने किराणा मालाचे भाव वाढले आहेत. जसा माल आला तसा तो विकला जात असून शिल्लकीचे प्रमाण कमी आहे. उत्पादन कमी हेच दरवाढीमागचे कारण आहे.-संजय लोढा, ठोक व्यापारी

हरभºयाचे उत्पादन प्रचंड झाल्याने हरभरा डाळीचे भाव कमी झाले होते. मात्र आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने हरभरा डाळीला मागणी वाढली आहे. बाहेरच्या राज्यात पाऊस झाला असून कामगारांची टंचाई असल्याने माल कमी प्रमाणात येत असून त्यामुळे दरवाढ झाली आहे.-संजय साखरे, किराणा दुकानदार

दोन महिन्यांपासून पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे भाजीपाल्याची नासाडी झाली. भाजीपाला कमी असल्याने आणि मागणी वाढल्याने दरवाढ होत आहे.   

 -शरद बोबडे, विक्रेते

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरvegetableभाज्या