शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वैभव पिचड भाजपवासी होणार की सेनेत जाणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 10:53 IST

अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

अहमदनगर/अकोले: अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. पिचड भाजपवासी होणार की शिवसेनेत जाणार याकडे तालुक्यातील पिचड समर्थकांसह सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी वैभव पिचड यांनी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट घेतली. तर बुधवारी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र युती झाल्यास अकोलेची जाग सेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे सेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.आमदार पिचड गेली महिनाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. सव्वा महिन्यानंतर दोन दिवसापूर्वी ते अकोलेत आले होते. ‘लोकमत’ने त्यांना पक्ष बदलाविषयी छेडले असता, त्यांनी आता फक्त भगवा शर्ट घालायचा बाकी ठेवलंय. असा उपरोधिक टोला लगावत पक्ष बदलाच्या वृत्ताचा इन्कार केला होता. आमदार पिचड मुंबईला जाताच पुन्हा पक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात धडकली. राष्ट्रवादी, सेना, भाजपच्या  स्थानिक  कार्यकर्त्यांनी खासगीत त्यास दुजोराही दिला आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार पिचड यांच्या सोबत मुंबईत आहेत. मंगळवारी मातोश्रीवर आणि बुधवारी वर्षा बंगल्यावर मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजप व सेनेच्या प्रमुख नेत्यांशी आमदार पिचड व त्यांच्या समर्थकांची पक्ष बदलाबाबत वाटाघाटीची चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. 

आज राष्ट्रवादीच्या मुलाखतीअहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात येणार आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात या मुलाखती पार पडणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीला जिल्ह्यातील नेमके कोण-कोेण उपस्थित राहणार हेही पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.