....
काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चची मुदत
अहमदनगर : शहरात सुरू असलेल्या शासकीय निधीतील कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चची मुदत आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. मनपाच्या अभियंत्यांकडूनही कामांची पाहणी करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
...
वाहनांना नो एंट्री
अहमदनगर : महापालिकेच्या औरंगाबाद महामार्गावरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात पदाधिकाऱ्यांसह ठेकेदारांची वाहने उभी केली जात होती. त्यामुळे प्रवेशद्वारातच वाहनांची गर्दी होत होती. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रवेशद्वारासमोर झाडांच्या कुंड्या ठेवून रस्ता बंद करण्यात आला आहे. या कुंड्या कुणी काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याच्याही सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
...
निविदा रद्दची मागणी
अहमदनगर : महापालिकेचे घनकचरा विभागप्रमुख नरसिंह पैठणकर यांच्या कार्यकाळातील सर्व निविदा नियबाह्य आहेत. ठेकेदाराकडून अडीच लाखांची लाच घेताना पैठणकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, त्याला महापालिकेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या कार्यकाळातील निविदा रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
....