अहमदनगर : येथील महानगरपालिकेकडून कोरोनावरील लस देण्यास शनिवारी सुरूवात झाली. भोसले आखाडा येथील जिजामाता आरोग्य केंद्रात खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भेट देत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक धनंजय जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आरोग्य केंद्रप्रमुख आयशा शेख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, खासगी दवाखान्यातील डॉक्टर तसेच अंगणवाडी सेवक यांना लस देण्यात येत आहे. महापालिकेकडे ७,५०० डोस आलेले आहेत. ज्यांना शनिवारी लस देण्यात आली त्यांना दुसरा डोस १३ फेब्रुवारी २०२१ रोजी देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला दोन डोस देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देण्यात आली. डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टसिंग पाळणे आवश्यक आहे.
--फोटो
१६ सुजय विखे
महापालिकेच्या जिजामाता केंद्रात लसीकरणाच्या कामाची खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाहणी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी उपस्थित होते.