विसापूर येथील केवळ पंधरा ते वीस टक्के नागरिकांना कोरोना लस मिळाली आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्या बऱ्याच लोकांना अद्याप दुसरा डोस मिळाला नाही. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येते. या ठिकाणी स्थानिक नागरिक पहाटे रांगेत उभे राहून टोकन नंबर घेऊन लसीकरण करून घेतात. बाहेरगावचे लोक पहाटे पिंपळगाव पिसा येथे जाऊन लसीकरणासाठी नंबर लावू शकत नाहीत. एक तर लस कधी उपलब्ध होणार याचा लोकांना मेळ लागत नाही. आज लसीकरण होणार आहे याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी नऊनंतर लोक पिंपळगाव पिसा येथे लस घेण्यासाठी गेले तर तेथे अगोदरच मोठी रांग असते. याठिकाणी दोनशे डोस उपलब्ध असतील तर पाचशे नागरिक लसीकरणासाठी नंबरला उभे असतात. त्यामुळे लोकांना आल्या पावली परत फिरावे लागते.
विसापूर येथे लसीकरण मोहीम राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST