शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर ; चार विक्रेत्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:24 IST

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

शेवगाव : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर शेवगाव नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरु असल्याने मुख्याधिकारी गर्कळ यांनी पालिकेचे विशेष पथक नेमले. या पथकाने शहरात तपासणी व कारवाईला सुरुवात केली असून नगर रस्त्यावरील राजलक्ष्मी स्वीट्स होम, राजलक्ष्मी बेकरी, आंबेडकर चौकातील राजधानी स्वीट्स व आखेगाव रस्त्यावरील बापजी शॉपिंग मॉल येथे पथकाने केलेल्या कारवाईत प्लास्टिक पिशव्या, चमचे जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या मोहिमेत मुख्याधिकारी गरकळ, लेखापाल सोमनाथ नारळकर, भारत चव्हाण, विशाल डहाळे, सिकंदर शेख, गोरक्ष काळे व इतर कर्मचारी सहभागी झाले. त्यानंतर शहरातील किराणा व्यावसायिकांनी मुख्याधिका-यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन प्लास्टिक वापराच्या नियमांची माहिती घेऊन पथकाला सहकार्य करण्याचे सूचित केले. किराणा व्यावसायिकांनी मायक्रो पिशव्यांची मागणी नोंदविली असून त्या पिशव्या उपलब्ध होताच त्याचा वापर सुरु करण्यात येईल. तोपर्यत पथकाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावPlastic banप्लॅस्टिक बंदी