शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर पोलीस अधिक्षकांची हप्तेखोरीच्या चर्चेची क्लीप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:18 IST

अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का अशी विचारणा करत असून एका बाईनी जिल्ह्यात फार पैसे कमावले आहेत का असा प्रश्नही कॉन्स्टेबलला विचारत आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी एक महिन्यापूर्वीच नगर जिल्ह्यात अप्पर अधिक्षकपदाचा पदभार घेतला होता. त्यामुळे अचानक बदली कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची व नेवासा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल गर्जे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली? आहे.--------------या क्लीपचा सारांश थोडक्यात असा.नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे नावाचे पोलीस कर्मचारी यांनी राठोड यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेमध्ये राठोड यांना भेटायला येण्याचे सांगत सगळे काही गोळा करून ठेवले आहे. कारवाई करायची गरज नाही. तुम्ही फक्त आदेश द्या. आपल्याकडे खूप मोठे बाऊन्सर आहेत. फक्त आपण सांगायचा उशिर आहे. आपला शब्द ते खाली पडू देत नाहीत.  आम्ही व आमचे डेरे साहेब तुम्हाला भेटायला येतो. आल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असे गर्जे सांगतात. त्यावर राठोड म्हणतात, तू सांगितले म्हणजे होईल का? त्यासाठी रेड टाकायला तिकडे यावे लागेल का?असा प्रश्न राठोड यांनी गर्जे यांना केला. त्यावर गर्जे म्हणतात, रेड टाकण्याची आवश्यकता नाही. सगळे काही तयार करून ठेवले आहे.

याबाबत राठोड यांची भूमिका जाणून घेण्यासाठी लोकमत’ने त्यांच्याशी तीनवेळा संपर्क केला. मात्र ते नंतर बोलू, असे म्हणाले.----उत्तरेत चांगले मार्केट दिसतेउत्तरेत (उत्तर नगर जिल्हा)चांगले मार्केट आहे. माझी बदली तिकडेच व्हायला हवी होती, असे राठोड यांनी सांगताच, गर्जे म्हणाले, साहेब तुम्ही तिकडे राहिले काय किंवा इकडे, काय फरक पडतो ? आम्ही तुम्हाला भेटायला येतोच. त्यावर राठोड म्हणतात, ह्यनुसताच येतो की माल घेऊन येतोह्ण. बाईने लय कमावले का? असाही प्रश्न राठोड करतात. त्यावर गर्जे म्हणतात, त्यांना प्रत्येक पोलीस ठाण्याकडून ५० लाख रुपयांचा हप्ता येतो. वैयक्तीक वसुली देखील मोठ्या प्रमाणावर आहे. नेवासा तालुक्यातील मोठ्या बियाणे उद्योजकाच्या नावाचाही या क्लीपमध्ये समावेश आहे. हा उद्योजक पोलिसांचा शब्द खाली पडू देत नाही, असे हा कॉन्स्टेबल सांगत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी