शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निराधार माउलीची कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. सतीष सोनवणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:28 IST

जाणा-या - येणा-यांना दगडे मारायची. काही टवाळ पोरं तिच्या वेडसरपणाचा फायदा घेत तिला त्रास द्यायचे.

अहमदनगर : जाणा-या - येणा-यांना दगडे मारायची. काही टवाळ पोरं तिच्या वेडसरपणाचा फायदा घेत तिला त्रास द्यायचे. एका कार्यकर्त्याने तिला डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या माउली संस्थेत दाखल केले. मात्र तिला स्तनाचा आजार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मॅक्सकेअरच्या डॉ. सतीश सोनवणे यांनी तिला स्तनाच्या कॅन्सरपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिच्यावरील कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. सोनवणे यांनी सर्व उपचार मोफत करुन सामाजिक बांधिलकी जपली.एके दिवशी माउली संस्थेत एका कार्यकर्त्याने फोन करुन एका महिलेची माहिती दिली. त्यानंतर माउलीची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. या महिलेला माउली संस्थेत दाखल करण्यात आले. तिच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये तिच्या डाव्या स्तनाला गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मॅक्सकेअर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांच्याकडे या महिलेस नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत विविध तपासण्या करण्याची गरज असल्याचे सांगितले. तपासण्या करण्यासाठी खर्चाची विचारणा  डॉ. धामणे यांनी केली. मात्र खर्चाची जबाबदारी माझ्याकडे सोपवा, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे धामणे दाम्पत्यानी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर पुढील प्रवास सुरु झाला.प्रशासकीय अधिकारी जोसेफ पाटोळे, डायरेक्टर डॉ. राजेंद्र गायके यांनी तातडीने हालचाली करत सगळ््या तपासण्या सुरु केल्या. रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाने, फिजिशियन डॉ. अभिजित शिंदे यांनी तपासण्या केल्या. डायग्नोस्टिकचे डॉ. बाबा शिंदे यांनी तपासणी करुन हा कॅन्सर असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. वाढलेल्या कॅन्सरमुळे पूर्ण स्तनच काढून टाकण्याचे आॅपरेशन करावे लागणार होते. डॉ. सोनवणे यांनी सर्व तयारी केली. कायदेशीर जबाबदारी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांनी घेतली. मॅक्सकेअर रुग्णालयात डॉ. सोनवणे व सहकाºयांनी गुंतागुंतीचे आॅपरेशन यशस्वीपणे पार पाडले.शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. पंकज वंजारे, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. पीयूष पाटील, रुग्णालयाचे संचालक डॉ. मोहम्मद माजीद, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. आनंद काशीद, डॉ. सुदाम जरे, डॉ. निलेश परजणे, जनसंपर्क अधिकारी शैलेश सदावर्ते यांनी परिश्रम घेतले. केमोथेरपी आणि रेडीओथेरपीच्या सर्व सुविधा मोफत देण्याची जबाबदारीही डॉ. सोनवणे यांनी घेतली. तिची काळजी घेण्यासाठी धामणे दाम्पत्य, त्यांचा मुलगा किरण, माउलीतील एक भगिनी, अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. शरद बोरुडे, विजय साबळे, सागर लंके कष्ट घेत होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक