शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

खासगी कार्यक्रमात विनापरवाना उडतात ड्रोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:55 IST

ड्रोन कॅमेरे उडविताना मात्र व्यावसायिक शासकीय परवानगीच घेत नसल्याचे समोर आले आहे़. आकाशात विनापरवाना उडणा-या या ड्रोनमुळे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी होऊन सुरक्षितता धोक्यात येऊ शकते़. 

अरुण वाघमोडे / नागेश सोनवणे । अहमदनगर : हल्ली लग्नसोहळा, वाढदिवस अथवा इतर खासगी कार्यक्रमांत ड्रोन कॅमे-याच्या सहायाने फोटो व शुटिंग घेण्याचा ट्रेंड वाढत आहे़. हे ड्रोन कॅमेरे उडविताना मात्र व्यावसायिक शासकीय परवानगीच घेत नसल्याचे समोर आले आहे़. आकाशात विनापरवाना उडणा-या या ड्रोनमुळे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी होऊन सुरक्षितता धोक्यात येऊ शकते़. भारतात ड्रोनच्या वापरांवर कडक निर्बंध आहेत. ड्रोन किंवा ड्रोन कॅमेरांचा सर्वाधिक वापर हा सशस्त्र सेना, निमलष्करी दल, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती निवारण दलांकडून केला जातो. पोलिसांना ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागते़. जिल्ह्यात मात्र गेल्या काही वर्षांत विनापरवाना खासगी कार्यक्रमांत सर्रास ड्रोन कॅमेरे उडताना दिसतात़ नगर शहरात लष्कराची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच भंडारदरा, मुळा डॅम ही धरणे तर शिर्डी, शनिशिंगणापूर हे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. या परिसरातही खासगी कार्यक्रमांसाठी ड्रोन कॅमेरे वापरले जातात. खासगी कार्यक्रमासाठी ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते़. प्रत्यक्षात मात्र महसूल विभागाकडे पोलिसांनी मोर्चासाठी अथवा इतर शासकीय कार्यक्रमांसाठी ड्रोनबाबत परवानगी घेतल्याचे दिसून आले आहे़. खासगी कार्यक्रमासाठी एकानेही परवानगी घेतलेली नाही़. ड्रोनसाठी महसूल विभागाकडून परवानगी घेताना पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असते़. प्रत्यक्षात मात्र या परवानगीकडे ड्रोन कॅमे-याचा व्यवसाय करणारे आणि कार्यक्रम घेणा-यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे़. विनापरवाना ड्रोन उडविणा-यांवर प्रशासनाकडूनही अद्यापपर्यंत काहीच कारवाई झालेली दिसत नाही़. असा होऊ शकतो गैरवापर ड्रोन म्हणजे वैमानिकरहित छोटेखानी विमाऩ विमान, हेलिकॉप्टर अथवा इतर वाहन जेथे जाऊ शकत नाही. तेथे ड्रोन सहज पोहोचते़ या ड्रोनला हाय डेफिनिशनचे कॅमेरे जोडता येतात. मोकळा परिसर, इमारत, धार्मिक ठिकाणे अथवा धरण आदी परिसराचे या ड्रोनच्या सहाय्याने सहज फोटो अथवा शुटिंग काढता येते़. ड्रोनचा आकार लहान असतो़ आवाजही कमी होतो़. त्यामुळे या ड्रोनचा सहजरित्या कुणीही गैरवापर करू शकतात़. जिल्ह्यात विनापरवाना उडणारे हे ड्रोन प्रशासनाने अद्यापपर्यंत तरी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही़. ड्रोन कॅमेरा २५० ग्रॅम व त्यापेक्षा कमी वजनाचा असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र यापेक्षा जास्त वजनाचा ड्रोन असेल तर त्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे़. 

ड्रोन उडविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते़. विनापरवाना ड्रोन उडविल्याची तक्रार प्राप्त झाली तर गृहशाखा संबंधितांवर कारवाई करण्याची शिफारस पोलिसांकडे करते़, असे नायब तहसीलदार राजू दिवाण यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी