शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

एकाच वेळी २२ पिके घेण्याचा अनोखा प्रयोग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:44 IST

पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.

अशोक मोरेपाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गर्भगिरी डोंगराच्या कुशीत अनेक लहान-मोठी गावे, वाडया, वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे, पावसाचे प्रमाण नेहमीच कमी असल्याने या भागातील शेतकºयांना एखादे पीक हाती लागेल की नाही याची शाश्वती नसते. परंतु कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर या भागातील शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकºयाने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतकºयांपुढे ठेवला आहे. त्यांच्या या शेतीला नुकतीच तामिळनाडू येथील नैसर्गिक शेतीतज्ज्ञ वेद्री सेलवन, सोशल सेंटरचे डॉ. जिवेंद्र जाधव व त्यांच्या सहकाºयांनी भेट दिली. त्यावेळी परिसरातील व भट्टीवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छानराज क्षेत्रे म्हणाले, डाळिंब, शेवगा, मिरची, ग्लिरिसीडिया, हळद, हदगा, बाजरी, आंबा, पपई, दुधी भोपळा, वाटाणा, केळी, मका, झेंडू, अननस, बटाटा, उडीद, ज्वारी, पेरू, करंज, एरंड, चारा गवत आदी पिकाची एकाच क्षेत्रात लागवड केली आहे. यास रेन रोस पाईपद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. या पध्दतीमुळे पावसाप्रमाणे पिकास पाणी मिळून सर्व झाडे व पिके यांचा रोगापासून बचाव होतो. सोशल सेंटर अहमदनगर पुरस्कृत, अनुदानित, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण बदल, स्थलांतर व अन्नसुरक्षा प्रकल्पांतर्गत स्वामी व्हित्री चलन यांच्या मार्गदर्शनाखाली पाच थरांची शेती, प्राचीन पीक तत्वावर वरील पिकांची एकाच क्षेत्रात एकाचवेळी लागवड करण्यात आली असल्याची माहितीही छानराज क्षेत्रे यांनी दिली. या भागातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याने या भागातील शेतीस अनेक मान्यवर, सेलिब्रेटी, शेतीतज्ज्ञ या भागातील शेती पाहण्यासाठी भेटी देत आहेत. या भागात अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेती करू लागले असून, शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत.या शेतीने अनेक सेलिब्रिटी, शेतीतज्ज्ञांना जणू भुरळच घातली असल्याने ते भेटी देत आहेत, असे प्रगतशील शेतकरी छानराज क्षेत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीFarmerशेतकरी