शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्‍यांत वाढली अस्वस्थता

By admin | Updated: May 11, 2014 00:54 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे.

 अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे. मात्र, प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्‍यांत गोंधळाची स्थिती असून विशेष करून प्राथमिक शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बदल्यांपूर्वी मुख्याध्यापक, उपशिक्षक यांच्या पदोन्नत्या आणि समायोजन केल्यास त्याचा फायदा शिक्षकांना होईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचार्‍यांची ५ टक्के प्रशासकीय आणि १० टक्के बदल्या होत असतात. गेल्या वर्षी प्रशासकीय बदल्यां सोबत आपसी बदल्या झाल्या. मात्र, ऐनवेळी काही जिल्हा परिषद सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांना स्थगिती देण्यात आली. यंदा लोकसभा निवडणुका झालेल्या असून काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे प्रशासकीय बदल्यांमध्ये सुट मिळेल, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांमध्ये आहे. जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामपंचायत हे सर्वात मोठे संवर्ग आहेत. यातही प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्याचे दिव्य प्रशासना समोर आहे. १५ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. यात बदली पात्र कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी, विनंती बदली शिक्षकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक आणि उपशिक्षकांची पदोन्नती करणे आवश्यक आहे. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानूसार जिल्ह्यात सुमारे ६०० शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. पूर्वी पहिली ते सातवीपर्यंत कितीही पट (विद्यार्थी संख्या) असली तरी मुख्याध्यापकांच्या पदाला मान्यता होती. मात्र, आता नवीन कायद्यानूसार १ ते १५० पटसंख्येपर्यंत मुख्याध्यापक पदाला मान्यता आहे. यामुळे ३०० मुख्याध्यापक आणि ३०० उपशिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यामुळे या मुख्याध्यापकांचे समायोजन आणि पदोन्नती आधी होणे आवश्यक आहे. त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया राबविल्यास शिक्षकांची सोय होणार आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मुंबईत ग्रामविकास मंत्री यांची भेट घेवून प्रशासकीय बदल्या रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय निघालेला नाही. यामुळे शिक्षकांसह सर्वांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) सोमवारी बैठक शिक्षकांच्या बदल्या, त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी १२ तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे. यात बदल्या, समायोजन आणि पदोन्नतीबाबत चर्चा होणार आहे. प्रशासनाने शासनाच्या धोरणानूसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. मात्र, त्या करत असताना शिक्षकांची सोय पाहावी. गेल्यावर्षी पेसा कायद्याचा फटका अनेकांना बसला आहे. यामुळे आधी पदोन्नती, मग समायोजन आणि त्यानंतर बदल्या कराव्यात. यात प्रशासनाचा ताण कमी होणार आहे. -रावसाहेब रोहकले, शिक्षक नेते.