श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरे खांड येथील पोईफाटा या परिसरातील विजय कल्याण इंगळे (वय २) या बालिकेचा १८ आॅक्टोबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप या बालिकेचा मृतदेह सापडला नाही. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनास माहिती दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून सर्व नातेवाईक व संबंधित त्या तलावात मुलीचा शोध घेत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. यासाठी अग्निशमण व स्थानिक तहसील व पोलीस प्रशासनास कळविण्यात आले आहे. १५-१६ तास उलटूनही मृतदेह हाती लागला नसल्याने वेगळीच चिंता वाढली आहे.
शेततळ्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू; पिसोरे खांड येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 14:25 IST