शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात दुचाकीस्वार ठार; चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:55 IST

अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला.

केडगाव : अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगातील आणखी दोन वाहने धडकली. या धडकेत इतर तीन जण जखमी झाले.या अपघातानंतर अपघातग्रस्त तीन ते चार वाहने रस्त्यावरच उभी असल्याने अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रूग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटविली.अहमदनगर-पुणे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने दुसऱ्या बाजूवरील वाहतूक अस्ताव्यस्त होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. नगर तालुका पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातParnerपारनेर