शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये भंगारमधील दुचाकी गाड्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:59 IST

तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांना आग लागली होती.

ठळक मुद्देपोलीस स्टेशनमधील वाहने सात-बारा नोंदीची रेकॉर्ड रुम वाचली
लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांना आग लागली होती. जामखेड तहसिल कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन हे एकाच आवारात होते. यामुळे अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यासंबंधी जवळपास पन्नास ते साठ दुचाकी गाड्या या अवारातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे जामखेड पोलिसांनी ठेवलेल्या होत्या. त्यापैकी काही गाड्या नवीन पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या तर काही दोन चाकी गाड्या अनेक वर्षांपासून जुने तहसील कार्यालयात पडून आहेत. त्यांच्यावर गंज चढून त्या खराब झाल्या आहेत. आता तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन जवळच काही अंतरावर नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे याकडे तहसील व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. १२ मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या पाठीमागे अचानक धूर निघत असल्याचे निलेश शिंदे, दत्ता घुमरे या युवकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांना सदर माहिती दिली. भंडारी यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला माहिती दिली. बंब तातडीने दाखल झाल्याने इतर वाहने वाचली. परंतु पाच ते सहा मोटारसायकली जळून खाक झाल्या....रेकॉर्ड रुमचे नुकसान टळलेतहसील व पोलीस स्टेशन परिसरात संपूर्ण तालुक्याचे महत्वाचे दस्त ऐवज (रेकॉर्ड) रूम व संपूर्ण तालुक्याची सात-बारा व आठ ‘अ’ चे नोंदी असलेली संगणक रूमही जवळच होती. सुदैवाने या दोन्ही खोल्यांचे नुकसान झाले नाही. या ठिकाणी स्वच्छतागृह असल्याने अनेक लोक लघुशंकेसाठी जातात. यामुळे अज्ञात व्यक्तीने धुम्रपान करून सिगारेट ओढून टाकली किंवा शेजारी असलेला कचरा पेटविल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड