शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नशेत तर्रर्र शिक्षकाने श्रीगोंद्यात ठोकरल्या दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 18:21 IST

या दोन्ही अपघातात स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने लगेच त्यांना गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली.

श्रीगोंदा : पेडगाव येथील माध्यमिक विद्यालयातील एका मद्यपि शिक्षकाने नशेत तर्रर्र होऊन सोमवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन गाड्या ठोकरल्या. यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, एका स्वीफ्ट कारचे व दुस-या ओमिनी गाडीचे नुकसान झाले.पेडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर संबंधित शिक्षक सेवा करीत आहे़ सोमवारी दुपारी हा शिक्षक ओमिनी कारमधून तहसील कार्यालयाच्या आवारात आला. मात्र, तेथे वाहनांची गर्दी असल्यामुळे त्याला ओमिनी तहसील जवळील गेटमधून बाहेर काढता येईना. तो गाडी मागे-पुढे घेऊ लागला. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी बापू गायकवाड (रा. वांगदरी) यांच्या गाडीवर मागून धडकली. गाडी धडकल्याचे त्यांच्या लक्षात येताच संबंधित शिक्षकाने जोरदार रेस करीत तेथून गाडी काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एक अपघात झाला. यावेळी या मद्यपि शिक्षकाची ओमिनी समोरून येणा-या ओमिनी गाडीला धडक दिली. त्यानंतर नागरिकांनी गाडी कशीबशी थांबवून गाडी बंद केली. या दोन्ही अपघातात कोणालाही जखम झाली नाही. परंतु स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. मात्र धडक देणा-या मद्यपि चालकाच्या ओमिनी गाडीला काहीच झाले नाही़ स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने दोन्ही गाड्यांची लगेच नुकसान भरपाई देतो, असे सांगितले. लगेच त्यांना त्या शिक्षकाने त्याची गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी या मद्यपि शिक्षकाला घरी नेऊन सोडले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातTeacherशिक्षक