शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

नगर जिल्ह्यातील दोन हजार स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:04 IST

नगर जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य १ मार्चपासून आॅनलाईन पीओएस मशीनव्दारे मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य १ मार्चपासून आॅनलाईन पीओएस मशीनव्दारे मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आले असून, त्यांची उद्या गुरुवारी चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास पहिल्या आठवड्यात पीओएसव्दारे धान्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे आधार नसलेल्यांना यापुढे धान्य मिळणार नाही.शासनाने स्वस्त धान्य दुकानांना आॅनलाईन करून धान्य पीओएस मशीनव्दारे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगिक तत्वावर नगर जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून नगर जिल्ह्यात पीओएस वापराची रंगित तालिम सुरू होती. जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानांत पीओएस मशीन बसविण्यात आले आहेत. मार्च महिन्यांतील धान्य पीओएस मशीनव्दारे वितरीत करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मार्च पहिल्या आठवड्यात पीओएस मशीनची चाचणी घेऊन त्यात नवीन सॉप्टवेअर अपलोड केले जाणार आहे. आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिकांधारकांना यामुळे धान्य वितरीत करता येणार नाही. परंतु, आधारकार्डची याच मशीनव्दारे नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करून तातत्काळ धान्य देणेही शक्य होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय आॅनलाईन दुकाने

संगमनेर-१६४, अकोले-१६१, राहाता-८१, पाथर्डी-१५२, शेवगाव-१२४, कोपरगाव-११३, नगर-१२४, श्रीरामपूर-११०, जामखेड-१०३, पारनेर-१३९, राहुरी-१०८, नेवासा-१५१, श्रीगोंदा-१२४, कर्जत-१३५़

सात लाख आधारकार्ड सलग्न

जिल्ह्यात एकूण ७ लाख ८९ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी ७ लाख ७४६ शिधापत्रिकाधारकांचे आधार पीओएमशीनशी सलग्न करण्यात आलेले आहेत. पीओएस मशीनशी ज्यांचे अधार कार्ड सलग्न करण्यात आलेले आहेत, अशा शिधापत्रिकाधारकांना पीओएसव्दारे धान्य वितरीत केले जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानात एक रुपयाही न देता आंगठा देऊन धान्य मिळणार आहे.

८८ शिधापत्रिकाधारक विना आधार

आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्याचे धान्य मिळणार नाही. आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना नव्याने आधार कार्ड काढावे लागेल किंवा पुरवठा विभागाच्या अधिका-याने प्रमाणित केलेले पत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे आधार नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची मोठी अडचण होणार आहे.

आधार नसलेले शिधापत्रिकाधारकसंगमनेर-३,८७३, अकोले-२, ७१६, राहाता-२६६३, पाथर्डी-२७४५, शेवगाव-२८०५, कोपरगाव-४०५०, श्रीरामपूर-३९६५, नगर-५२५६, जामखेड-३४८४, पारनेर-८०३५, राहूरी-८८१९, नेवासा-९३६४, श्रीगोंदा-१०२२७, कर्जत-१२०४८.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय