शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना अटक; सात जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:18 IST

वेळापूर ते चासनळी रस्त्यावरील ब्राम्हणनाल्याजवळ बुधवारी (दि.१२) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. यात २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून सात दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. 

कोपरगाव : तालुक्यातील वेळापूर ते चासनळी रस्त्यावरील ब्राम्हणनाल्याजवळ बुधवारी (दि.१२) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. यात २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून सात दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.  याप्रकारणी पोलीस हवालदार दिगंबर रतन कोळी यांच्या फिर्यादीवरून भुरज्या उर्फ अर्जुन गोपाल पिंपळे (वय २०), जानू उर्फ अनिल ओपींन पिंपळे, संतोष मुन्शी चव्हाण, शरद ओपीन पिंपळे, तोलाराम उर्फ राजू विठ्ठल पिंपळे, बाबू बाबडी पिंपळे, ताईमाई ताराचंद काळे (सर्व रा.मोतीनगर, सुरेगाव ता.कोपरगाव), शरद गोटीराम फुलारे (वय २२, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव), किरण छगन सोनवणे (रा. दत्तनगर, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींकडून तीन विना नंबरच्या दुचाकीसह लोखंडी कोयता, लाकडी दांडा, मिरची पावडर व दोरी असा एकूण ६० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार संजय पवार, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के, अशोक आंधळे, प्रदीप काशीद, चंद्रकांत तोर्वेकर, सूर्यकांत पवार, अर्जुन बाबर, भगवान ढाका, पोलीस नाईक अशोक शिंदे, असीर सय्यद, बाळासाहेब धोंगडे, दीपक ढाकरे, किशोर कुळधर, जहिर शेख, दिगंबर कोळी यांच्या पथकाचा समावेश होता. बुधवारी अटकेतील आरोपीना कोपरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी