शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात गोळीबार करुन फरार झालेले दोघे अटकेत

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 16, 2023 13:29 IST

कोपरगाव (जि. अहमदनगर) : भावास मारहाण का केली? अशी विचाणा करणाऱ्यास कोयत्याने मारहाण करून गावठी कट्ट्यातून गोळी झाडणाऱ्या दोन ...

कोपरगाव (जि. अहमदनगर) : भावास मारहाण का केली? अशी विचाणा करणाऱ्यास कोयत्याने मारहाण करून गावठी कट्ट्यातून गोळी झाडणाऱ्या दोन आरोपींना शुक्रवारी रात्री कोपरगाव शहर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये पकडले. दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. १३ नोव्हेंबर रोजी तुषार माहाले यांच्या भावास आरोपी दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी मारहाण केली होती. आपल्या भावास मारहाण का केली? असे विचारले, त्याचा राग  आल्याने १३ नोव्हेंबरलाच रात्री साडेअकरा वाजता निवारा भागातील डॉ. झिया हॉस्पिटल समोर दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी तुषार माहाले यास मारहाण करण्यास सुरूवात केली.  तुषारला मारहाण करून कोयते उगारले, एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली होती. 'तु जर पोलिसांत तक्रार दिली, तर तुझी गेम करू' अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर चौघे तेथुन पसार झाले होते. 

या प्रकरणात तुषार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल शिवाजी शिदोरे (रा. गोकुळनगरी, कोपरगाव, दत्तु शांताराम साबळे (रा. निवारा कॉर्नर, कोपरगाव), चेतन सुनिल शिरसाठ (रा. टाकळीनाका, कोपरगाव), सिध्दार्थ प्रकाश जगताप (रा. टाकळीनाका, कोपरगाव) व त्यांच्या इतर साथीदार यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि ३०७, ३२३, ५०६, ३४, आर्म ॲक्ट ३-२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ राम खारतोडे, संभाजी शिंदे, बाबासाहेब कोरेकर, पोकॉ. यमनाजी सुंबे, महेश फड यांचे पथक तयार केले. या पथकाने नाशिक, अहमदनगर व इतरत्र जाऊन शोध घेतला परंतु आरोपी हे सापडले नव्हते. 

४ डिसेंबर रोजी रात्री गुन्ह्यातील आरोपींपैकी दोघे सिन्नर येथे एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहीती पथकाला मिळाली. हे पथक सिन्नर येथे जावुन हॉटेल मधुन चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांना ताब्यात घेतले. 

तीन दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडुन गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सांगितले. पुढील तपास पोसई रोहीदास ठोंबरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी