अहमदनगर : महापालिकेच्या आठ उपकेंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी दोनशे डोस उद्या शनिवारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांना ही लस दिली जाणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
महापालिकेने प्रभागनिहाय उपकेंद्र सुरू केले होते. परंतु, पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा गोंधळ उडाला होता. केंद्रांची संख्या वाढल्याने एका केंद्रावर १० ते २० डोस मिळत होते. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहून लस मिळत नव्हती. नागरिकांची लसीसाठी ससेहोलपट सुरू होती. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मनपाच्या आठ केंद्रांवरच लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नगरसेवकांकडून लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी होत असल्याने उपकेंद्रांची संख्या वाढली होती. अन्य उपकेंद्र बंद करून मनपाच्या आरोग्य केंद्रात शुक्रवारी लस दिली गेली. दिवसभरात ८०० नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला असून, शनिवारी कोविशिल्ड कंपनीची लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी २०० याप्रमाणे एक हजार ६०० नागरिकांना लस दिली जाणार आहे.
....
या केंद्रांवर मिळणार लस
- जिजामाता आरोग्य केंद्र, भोसले आखाडा
- महात्मा फुले आरोग्य केंद्र, माळीवाडा
- मुकुंदनगर आरोग्य केंद्र
- नागापूर आरोग्य केंद्र
- तोफखाना आरोग्य केंद्र
- सिव्हिल आरोग्य केंद्र, टीव्ही सेंटर
- आयुर्वेद महाविद्यालय
....
- महापालिकेच्या आठ आरोग्य केंद्रांवर शुक्रवारी कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. शनिवारी काेविशिल्डचे प्रत्येकी २०० डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका