शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई

By साहेबराव नरसाळे | Updated: July 16, 2023 14:54 IST

Ahmednagar: दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून १५ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले.

- साहेबराव नरसाळेअहमदनगर - दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून १५ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले. ईशान सलीम शेख (वय १९ वर्ष, रा. कोठला घासगल्ली, अहमदनगर), उदय हमीद खान (वय २० वर्षे, जमजम हॉटेल शेजारी पंचपीर चावडी, अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

जुन्या महानगरपालीकेजवळ दोन जण दुचाकीच्या डिक्कीत एक तलवार व एक कोयता बाळगुन गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने जुन्या महापालिकेजवळ सापळा लावून दुचाकीवरून येत असलेल्या संशयीत दोघांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता एक तलवार व कोयता आढळून आल्याने दोघांना त्याब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. तलवार व कोयता कोणाकडून व कोणत्या कामासाठी बाळगून असल्याचे विचारले असता दोन्ही शस्त्र त्यांचीच असल्याचे कबुली दिली आहे.  पोलीस शिपाई अतुल केशव काजळे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,  पोलिस नाईक सलीम शेख पुढील तपास करत आहेत.

पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलिम शेख, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी