शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

अडीच हजार शिक्षक बदलीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:20 IST

लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक (उपाध्यापक, पदवीधर, मुख्याध्यापक) या संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे़ सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे व एका शाळेवर तीन वर्ष पुर्ण झालेले, अवघड क्षेत्रात तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा केलेले शिक्षक व महिलांसाठी अवघड क्षेत्रात १ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिका बदलीस पात्र ठरविण्यात आले आहेत़ या बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी अवघड क्षेत्र तसेच अवघड क्षेत्रातील महिलांसाठी प्रतिकूल असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे़ त्यानुसार अवघड क्षेत्रात एकूण ३६८ शळा असून, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळांची संख्या ३४१ आहे़ अवघड क्षेत्रात काम केलेले बदलीस पात्र ठरलेले मराठी माध्यमातील शिक्षक व शिक्षिका यांची संख्या सुमारे ४६२ आहे तर उर्दू माध्यमातील बदलीस पात्र ठरलेले शिक्षक ५ आहेत़शिक्षकाचा जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्यास, एकच मुत्रपिंड असल्यास किंवा डायलिसीस सुरु असल्यास, कॅन्सरने आजारी असल्यास, मेंदूचा आजार असल्यास, थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक असल्यास अशा शिक्षक किंवा शिक्षिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे़ तसेच ज्या शिक्षकांच्या बदलीसंदर्भात तक्रारी असतील, त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव साळुंके, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीकडे बदलीचा आदेश निघाल्यापासून ७ दिवसात तक्रार लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे़ शिक्षकांच्या या तक्रारीवर ३० दिवसात निर्णय द्यावा, असे सरकारने बदल्यांच्या आदेशात म्हटले आहे़पती-पत्नी एकत्रिकरणाला सेवाज्येष्ठतेचा खोडाजिल्हांतर्गत बदलीमध्ये विशेष संवर्ग दोनसाठी पात्र असणारे पती, पत्नी शिक्षक एकाच जिल्हा परिषदेत कार्यरत असल्यास त्यांच्या एकत्रिकरणासाठी सरकारने २८ मे २०१९ रोजी परिपत्रक काढून सेवाज्येष्ठतेची अट टाकली आहे़ मात्र, २७ फेबु्रवारी २०१७ च्या परिपत्रकात पती, पत्नी एकत्रिकरणासाठी सेवाज्येष्ठतेची कोणतीही अट नव्हती़ आता सेवाज्येष्ठतेची अट टाकून दोघांपैकी एकाने अर्ज करावा, असा बदल करण्यात आला आहे़ त्यामुळे सेवाज्येष्ठतेची अट पती-पत्नीच्या एकत्रिकरणाला बाधा आणत असून, ही अट रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे़ याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना निवेदन दिले आहे़ तसेच शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याशीही चर्चा केली़ यावेळी शिक्षक संजय धामणे, गणेश कुलांगे, बाळासाहेब कासार, संभाजी जाधव, सुरेश कोरडे, सुखदेव आठरे, युवराज जाधव आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद