शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण

By नवनाथ कराडे | Updated: May 18, 2019 14:20 IST

विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे.

नवनाथ खराडेअहमदनगर : विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे. पूर्वी फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनाच हा लाभ मिळत होता. मात्र २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा स्तरापासून आणि एन.सी.सी, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळणार असल्याने यंदा जिल्ह्यातील तब्बल तेराशे खेळाडूंना सवलतीचा लाभ मिळणार आहे.खेळाची भावना वाढीस लागावी या हेतूने राज्य सरकारने २६ खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य दाखविल्यास दहावी व बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी विद्यार्थी खेळाडूंना सवलतीचे गुण देण्यात येत होते.गुणासंदर्भात जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे पाठवावा लागतो.२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सवलतीचे गुण देण्यासाठी सरकारने व्याप्ती वाढवली आहे. जिल्हास्तर, विभाग स्तरावरील खेळाडूंनाही आता हे वाढीव गुण मिळणार आहे.याशिवाय एन.सी.सी, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रस्तावाची संख्या वाढली आहे.गेल्या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील दहावीच्या ९२ तर बारावीच्या ७२ विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले होते.यंदा दहावीसाठी तब्बल ७७१ खेळाडूंचे तर बारावीसाठी ४६१ खेळाडूंचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार २३२ विद्यार्थी खेळाडूंना वाढीव गुणांचा लाभ मिळणार आहे.असे मिळणार गुणजिल्हास्तर प्राविण्य - ०३विभागस्तर प्राविण्य - ०५राज्यस्तर प्राविण्य - ०७राष्ट्रीय स्तर- १० (प्राविण्य), 0७ (सहभाग)आंतरराष्ट्रीय : २५ प्राविण्य, २०- सहभागसंघटनातील वादामुळे काही खेळाडूंचे नुकसान४२६ खेळ प्रकारात खेळाडूंना वाढीव गुण मिळणार आहेत. मात्र, व्हॉलीबॉल, स्विमिंग आणि सायकलिंग या खेळप्रकारातील खेळाडूंना हा लाभ मिळणार नाही. या खेळांच्या समांतर संघटना सुरु असल्यामुळे संघटनांमध्ये वाद सुरु आहे. त्यामुळे संघटनांच्या वादामध्ये खेळाडूंचे नुकसान होणार आहे.एन.सी.सी, स्काउट व गाईडएनसीसीमध्ये प्रजासत्ताक दिन संचलन, राष्ट्रीय स्तर शिबिर तसेच संलग्न स्पर्धेमध्ये सहभाग असल्यास सवलतीचे १० गुण मिळणार आहेत. यामध्ये पदक प्राप्त केल्यास १५ गुण, आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभाग असल्यास २० गुण मिळतील.स्काउट व गाईड या प्रकारात राष्ट्रपती पदक किंवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिरात सहभाग असल्यास १० गुण मिळणार आहेत.२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जिल्हास्तरापासून वाढीव गुण मिळणार असल्याने प्रस्तावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सहावीपासून दहावीपर्यंत/ बारावीपर्यंत कधीही खेळल्यानंतर सवलतीचे गुण मिळणार आहेत. शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरु आहे. - कविता नावंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय