शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

तेवीस जणांची अनामत जप्त

By admin | Updated: March 18, 2024 16:37 IST

अहमदनगर : नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवार वगळता सर्वच्या सर्व २३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत.

अहमदनगर : नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवार वगळता सर्वच्या सर्व २३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. प्रचारासाठी फिरुनही मोदीलाटेपुढे त्यांना त्यांची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात दुरंगीच लढती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर दक्षिणमध्ये १३ उमेदवार रिंगणात होते. दिलीप गांधी यांना ६ लाख ५ हजार १८५ मते पडली, तर राजीव राजळे यांना ३ लाख ९६ हजार ६३ मते पडली. अनामत रक्कम वाचवायची असेल तर एक लाखांच्यापुढे मतदान होणे आवश्यक आहे. मात्र नगर दक्षिणमध्ये गांधी-राजळे वगळता एकाही उमेदवाराला एक लाखांचा आकडा गाठता आला नाही. अनामत रक्कम जप्त झाली त्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे किसन काकडे (८३३६), अजय बारस्कर ( ६००३), शिवाजी डमाळे (१३८५),आपच्या दीपाली सय्यद (७१२०), पोपट फुले (१०६१),अनिल घनवट (३०८६), बी. जी. कोळसे पाटील (१२६८३), विकास देशमुख (२२०२),पेत्रस गवारे (२५२५),लक्ष्मण सोनाळे (३४९७),श्रीधर दरेकर (५६४९) यांचा समावेश आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. एक लाखांच्या पुढे जाणारे सदाशिव लोखंडे (५३२९३६) आणि भाऊसाहेब वाकचौरे (३३३०१४) हे दोनच उमेदवार होते. त्यांच्याशिवाय एकाही उमेदवाराला एक लाखांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामध्ये आपचे नितीन उदमले (११५८०),अ‍ॅड. महेंद्र शिंदे (१०३८१), विजय पवार (२३३४), रघुनाथ मकासरे (३१९३),पोपट सरोदे (१४२९),संतोष रोहम (९२९६),उद्धवराव गायकवाड (१४९९), संदीप घोलप (२२२९),बाळासाहेब बागुल (४३१९), गंगाधर वाघ (२८७४), रवींद्र शेंडे (४७२८), सयाजी खरात (२९५४) यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी) दीड लाख मतदान एकूण झालेल्या मतदानाच्या आकडेवारीच्या एक षष्ठांश मते उमेदवाराला मिळणे आवश्यक आहेत. त्याखाली मतदान झाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. खुल्या मतदारसंघासाठी २५ हजार रुपये, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उमेदवारांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम होती. नगरमध्ये १० लाख ५४ हजार वैध मतदान होते़ शिर्डीत ९ लाख २२ हजार वैध मतदान होते़