शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरकरांनी रिचवली साडेबारा लाख लिटर दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:58 IST

जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर नगरकरांनी मागील पंधरा दिवसात तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची खरेदी केली आहे. या दारु विक्रीतून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

अरुण वाघमोडे । अहमदनगर : जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर नगरकरांनी मागील पंधरा दिवसात तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची खरेदी केली आहे. या दारु विक्रीतून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी घातली होती. ५ मे रोजी ही बंदी उठवून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दारू विक्रीला परवानगी देण्यात आली. दारु विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर मद्यप्रेमींनी पहिल्याच दिवशी तब्बल ९९ हजार ३२८ बल्क लिटर दारूची खरेदी केली. अवघ्या सात तासांत साडेचार कोटी रुपयांची दारू विक्री झाली होती. पुढील पंधरा दिवसातही दारूला मोठी मागणी वाढून तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची विक्री झाली. दारू खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाने दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. नगर शहर व जिल्ह्यात या योजनेला विशेष काही प्रतिसाद मिळालेला नाही. मद्यप्रेमी दुकानात येऊनच दारू खरेदी करणे पसंत करत आहेत.परमिट रूममधूनही मिळणार दारू५ मेपासून प्रशासनाने देशी दारू दुकान व वाईन शॉपमधून दारू विक्रीला परवानगी दिली होती. परमिट रूम चालकांकडे मात्र मोठ्या प्रमाणात दारूसाठा शिल्लक असून या दारूची काही दिवसात मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रशासनाने काही अटी व शर्तीनुसार परमिट रूम चालकांनाही एमआरपीप्रमाणे सीलबंद दारु विक्रीला परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) व त्या लगतचे पाचशे मीटर क्षेत्र वगळून इतर परमिट रूममधून दारू विक्री करता येणार आहे. यामध्ये १९ मार्चपर्यंत शिल्लक राहिलेला साठा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विक्री करता येणार आहे. हा मद्यसाठा संपल्यानंतर परमिटरूम चालकांना लॉकडाऊन कालावधीत नवीन मद्यसाठा खरेदी करता येणार नाही, अशा स्वरूपाचा आदेश देण्यात आलेला आहे.गावठी दारूचे अड्डे सुरूचजिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाली असली तरी ग्रामीण भागात विविध   ठिकाणी गावठी दारू तयार करून त्याची विक्री केली जात आहे. मागील दोन महिन्यात   पोलीस प्रशासनाने दीडशेपेक्षा जास्त गावठी दारू अड्डे  उद्ध्वस्त  करून गुन्हे दाखल केले आहेत. तरीही गावठी दारू मात्र काही कमी झालेली नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस