शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

उपचारपध्दती अन व्यायामाने हाडांच्या आजारापासून मुक्तता : डॉ. जगदीश चहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:34 IST

हाडे आणि सांधे आरोग्य सप्ताह नुकताच संपन्न झाला. हाडे आणि सांध्याच्या आजाराने अनेकांना ग्रासले जाते.

अहमदनगर : हाडे आणि सांधे आरोग्य सप्ताह नुकताच संपन्न झाला. हाडे आणि सांध्याच्या आजाराने अनेकांना ग्रासले जाते. मात्र योग्य उपचार न मिळणे, व्यायाम किती व कसा करावा याचे मार्गदर्शन नसल्यामुळे त्रास वाढतच जातो. योग्य उपचारपध्दती अन नियमित व्यायामाने हाडांच्या आजारापासून कायमती मुक्तता मिळत असल्याचे मत डॉ. जगदीश चहाळ यांनी व्यक्त केले. हाडे आणि सांधे आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने साई एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर ‘मणके व सांधे विकार तज्ञ’ डॉ. जगदीश चहाळ-पाटील यांच्याशी ’लोकमत’शी साधलेला संवाद.डॉ.चहाळ म्हणाले, हाडे तयार होण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ‘डी’, बी-१२, व्हिटॅमिन ‘सी’ हे महत्वाचे घटक आहेत. सांधे हे कार्टीलेजचे बनलेले असतात. हाडे आणि सांध्यामध्ये नसा हा सर्वात महत्वाच्या असतात.अनेकांची हाडे अनुवांशिकरित्या ठिसूळ असतात. हा आजार अनेकांना जन्मत: असतो. वयाच्या पाचव्या वर्षानंतर मुडदूस होऊ शकतो. कॅल्शिअमची कमतरता, पोटाचे विकारामुळे मुडदूस होतो. वयाच्या २० ते ३० वर्षामध्ये संधीवात होतो. मणकेवातही होण्याची शक्यता असते. मणकेवात हा उतारवयात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. मासिक पाळी बंद झाल्यावर अथवा गर्भपिशवी लवकर काढल्यास हाडांमधून रक्तामध्ये कॅल्शिअम जाते. त्यामुळे कंबरदुखीचे प्रमाण वाढते. या वयात खुब्याचे फॅक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हाडांच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य आहे. आनुवंशिक आजार असेल तर तज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार करावेत. मुडदूस टाळण्यासाठी कॅल्शिअम, विटॅमिन डी वाढणे गरजेचे आहे. यासाठी डॉक्टरांना भेटून उपचारपध्दती सुरु करावी. वीटॅमीन डी वाढण्यासाठी सुर्यप्रकाश महत्वाचा आहे. सकाळी १२ वाजेपर्यत सूर्यप्रकाश घ्यावा. आहारामध्ये दूध, अंडी, भरपूर प्रमाणात पाणी, मासे, डाळी, मोड आलेल्या कडधान्याचा वापर करावा. रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. हाय इम्टॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटी जपून कराव्यात. व्यायाम करण्यापुर्वी वॉर्मअप करावे. उपचार पध्दतीने हाडांचे व सांध्याच्या आजारांपासून मुक्तता मिळू शकते. खांदा, गुडखा, खुबा यांच्यावर दुबिर्णीच्या शस्त्रक्रिया करता येतात. मणक्यावर प्रमाणापेक्षा जास्त आल्यावर नसा दबल्या जातात. अलिकडे अत्याधुनिक उपचारपध्दती विकसित झाल्या आहेत. मणक्याच्या फॅक्चरवर विना टाक्याची सजर्रीही करता येते. गुडघ्यावर जास्त ताण न येण्यासाटी कमोडचा वापर करावा. सांध्याच्या आजारांमध्ये खांदेदुखी, टेनिस एल्बो दुर्बिणीने शस्त्रक्रिया कराव्या लागतात. संधीवाताच प्रकार जाणून घेऊन उपचार कराव लागतात. उतारवयात सांधे जास्त खराब झाल्यास आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रियाही करता येते. तरुणांमध्ये खुबा खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा आजार दारुचे सेवन, अधिक प्रणामात स्टेराइडचा वापर केल्यास उदभवतो. हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर तंदुरूस्त होण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. आजारांवर लवकर उपचार केल्यास, व्यवस्थित काळजी घेतल्यास, पहिल्यासारखे जीवन जगता येते, असेही डॉ. चहाळ यांनी सांगितले.३० ते ३५ टक्के आजार अपघातामुळेभारतामध्ये ३० ते ३५ टक्के हाडांचे आजार अपघातामुळे होतात. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा. सीट बेल्ट वापरावा. वेगावर नियत्रंण ठेवावे. दुर्देवाने अपघात झाल्यानंतर रक्तस्त्राव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. अपघातग्रस्ताची जास्त हालचाल होऊ देऊ नये. अपघातग्रस्तावर उपचार करणे जास्त आव्हानात्मक असते. जीवाचा धोका टळल्यानंतर बाकीेचे आॅपरेशन करावी लागतात. या प्रक्रियेमध्ये ट्रामाकेअर युनिट महत्वाची भुमिका बजावते. या युनिटमध्ये आॅर्थोपेडिक सर्जन, न्युरोसर्जन फिजिशियन, जनरल सर्जन, प्लॅस्टिक सर्जरी, रेडिओलॉजिस्ट या सर्वांची टीम अपघातानंतर काम करत असल्याचे डॉ. चहाळ यांनी सांगितले.खेळाडूंना हाडांचे आजार सर्वात जास्तखेळाडू सराव असताना त्याचा सर्वात जास्त ताण नसांवर असतो. अनेकदा खेळाडूंच्या खांदा, गुडघा यांच्या नसा तुटतात. नसांवर वेळीच उपचार न झाल्यास सांधा खराब होण्याची शक्यता असल्याचे डॉ. चहाळ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर