शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

आघाडीच्या तिघांवर सेनेची मदार

By admin | Updated: May 22, 2016 00:18 IST

अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली आतापासूनच वेगवान झाल्या असून आघाडीच्या तीन नाराज नगरसेवकांवर सेनेची मदार कायम आहे.

अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली आतापासूनच वेगवान झाल्या असून आघाडीच्या तीन नाराज नगरसेवकांवर सेनेची मदार कायम आहे. सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी गुप्त बैठकांना वेग आला आहे. युती व आघाडीकडून अजूनपर्यंत तरी महापौर पदी कोण? याची निश्चिती झालेली नाही. महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ जूनअखेर संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच नवीन महापौर पदाची निवडणूक होणार आहे. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने महापालिकेवर भगवा फडकवायचा, असा चंग सेनेने बांधला आहे. सेनेकडे सुनीता भगवान फुलसौंदर, अनिता राजेंद्र राठोड, सुरेखा संभाजी कदम हे महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यादृष्टीने कदम, फुलसौंदर, राठोड, अनिल शिंदे हे नगरसेवकांची जुळवाजुळव करीत आहेत़ जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे, कॉँग्रेसचे संजय लोंढे, मुद्दसर शेख सेनेच्या गळाला लागले होते. महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहून तिघांनी सेनेला मदत केली होती. आताही या तिघांवरच सेनेची मदार आहे. किशोर डागवाले, पोटनिवडणुकीत योगीराज गाडे यांची वाढलेली एक जागा आणि सेनेचे १८ अशा वीस नगरसेवक सेनेकडे आहे. अपक्ष नगरसेविका उषा शरद ठाणगे या सेनेच्या गोटात गणल्या जात आहेत. भाजपचे ९ आणि आघाडीचे ३ नाराज असे ३३ नगरसेवक सेनेकडे होते. त्याच जोरावर सेनेकडून महापौर पदासाठी कस लावला जात आहे. आघाडीकडून कॉँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर, राष्ट्रवादीच्या नीता घुले, आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप या तिघांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. (प्रतिनिधी) मनसेला सांभाळण्याची कसरतसार्वत्रिक निवडणुकीपासून मनसे राष्ट्रवादीसोबत आहे. स्थायी समितीचे सभापतीपद मनसेला पाच वर्षे दिले जाईल, असा शब्द राष्ट्रवादीने मनसला दिला आहे़ किशोर डागवाले यांनी सभापतीपद भोगल्यानंतर सेनेत प्रवेश केला आहे. दुसरे नगरसेवक गणेश भोसले यांनीही सभापती पद भोगले आहे. स्थायी समिती अर्धवट असल्याने अजूनही भोसले हेच सभापती आहेत. सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा यांना सभापती पदाची आस आहे. मात्र, महापौर पदाच्या निवडणुकीनंतरच सभापती पदाची निवडणूक होणार असल्याने जाधव, बोज्जा यांना सांभाळण्याची कसरत आघाडीला करावी लागणार आहे. कारण सेनेकडूनही या दोघांना सभापती पदाची ‘आॅफर’ आल्याची माहिती सूत्रांनी दिली.असे आहे संख्याबळशहर विकास आघाडी २१ (राष्ट्रवादी १७ व ४ अपक्ष)कॉँग्रेस ११सेना २० (डागवालेंसह)भाजप ९अपक्ष ४ मनसे ३मातोश्रीवरुन ठरणार सेनेचा उमेदवारसेनेचा उमेदवार मातोश्रीवरून निश्चित होणार आहे. भाजपमध्येही उपमहापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या सहा नगरसेवकांना उपमहापौर पदाचे डोहाळे लागले आहेत. आघाडीचा उमेदवार स्थानिक पातळीवरच निश्चित होणार आहे. जगताप-कळमकर हे दोघे उमेदवार निश्चित करून पक्षश्रेष्ठींना कळवतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मे अखेरीस युती व आघाडीचे महापौर पदाचे उमेदवार निश्चित झालेले असतील, असे सूत्रांनी सांगितले.