पाथर्डी : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात जो अपडेट असेल त्याचाच टिकाव लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी व्यक्त केले. पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयाने तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटन गुगळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त धरमचंद गुगळे, सदस्य घेवरचंद भंडारी, विश्वजित गुगळे, प्राचार्य अशोक दौंड उपस्थित होते.
गुगळे म्हणाले, वेबसाईट तयार करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट, अचूक नियाेजन व सातत्य असावे लागते. प्राचार्य अशोक दौंड व त्यांच्या सहयोगी शिक्षकांनी प्रचंड मेहनत करून ही वेबसाईट तयार केली आहे. याचा निश्चितच फायदा विद्यालयाच्या भरभराटीसाठी होणार आहे. प्राचार्य अशोक दौंड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी केले. जब्बारखान पठाण यांनी आभार मानले.