अहमदनगर : आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुरुवार (दि़२५) पासून शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे़ नवरात्रौत्सवानिमित्त घरोघर घटस्थापना होत असून, देवी मंडळांच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़नवरात्रौत्सवानिमित्त देवीमंदिरांमध्ये विश्वस्त मंडळांकडून व सार्वत्रिक मंडळांकडून नऊ दिवस कीर्तन, सांस्कृतिक व धार्मिक पूजापाठ आयोजित करण्यात आले आहेत़ घरोघर घटस्थापना करुन भाविक नऊ दिवस उपवास धरतात़ बुधवारी उपवासाचे पदार्थ आणि घटस्थापनेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरु होती़ शहरातील माळीवाडा, नेप्ती नाका चौक, दिल्ली गेट, चितळे रस्ता, गांधी मैदान, सावेडीतील प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक अशा विविध ठिकाणी घटस्थापनेचे साहित्य विकण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहे़ गुरुवारीही दुपारी १२ वाजेपर्यंत घटस्थापना साहित्य विक्रीचे स्टॉल सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ सकाळी घटस्थापना होणार आहे़ घटस्थापनेनंतर घरोघर ‘देवी महात्म्य’चे वाचन केले जाते़ त्यामुळे घटस्थापनेच्या साहित्यासोबतच ‘देवी महात्म्य’च्या पुस्तकांना मागणी वाढली आहे़ घटस्थापनेसाठी सार्वत्रिक मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अनेक ठिकाणी सिनेकलवतांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत़घटस्थापना मुहूर्ताची शुभ वेळ सकाळी ६ ते ९ आणि दुपारी १२ ते १.३० वा. अशी आहे. प्रतिपदा ही दुपारी दीडवाजेपर्यंत असल्याने त्यापूर्वी घटस्थापना करावी. ज्यांना नऊ दिवसाचे उपवास शक्य नाहीत, त्यांनी घटस्थापना होईपर्यंत उपवास करावा. तसेच महाआष्टमीचा उपवास करावा. नवमी आणि दशमी यंदा एकत्र आल्याने नवरात्रौत्सव नऊ दिवसांचा आहे. दसरा हा नवमीच्या दिवशीच (दि.३) साजरा होणार आहे, असे वेदाचार्य बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.लाखोची उलाढालनवरात्र उत्सवात भाविक नऊ दिवस उपवास भरतात़ त्यासाठी भाविकांकडून केळी, रताळी, भगर, शाबुदाणा, खारिक, खजूर, खोबरे, राजगीरा आदी उपवासाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते़ बुधवारी उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग दिसून आली़ यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे विके्रते गिते व पुंड यांनी सांगितले़घट, विड्यांची पाने, परडी, मंडपी, हळदी कुंकू, नारळ, चौरंग, अस्तर अशा घटस्थापनेच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत़ घटस्थापनेचे साहित्य घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते़ घटस्थापनेचे साहित्य भाविकांच्या भावनेशी निगडीत असल्याने महागड्या दराने विकले जात नाही़ - भारती भगत, विक्रेते‘माती’ला आले मोलघटस्थापनेसाठी आवश्यक असलेली माती (वावरी) शहरी भागात उपलब्ध होत नाही़ त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी शेतातील माती आणून शहरात विक्रीसाठी मांडली आहे़ घटस्थापनेसाठी माती घ्यावयाची असल्यास भाविकांना ५० ते १०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहे़
आज घटस्थापना
By admin | Updated: September 25, 2014 00:03 IST