शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सांभाळाचा आला कंटाळा : मुलांनी केला वडीलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:13 IST

वडीलांचा कंटाळा आल्याने खून केल्याची कबुली त्यांच्या दोन्ही मुलांनी दिली.

संगमनेर  : वडील नेहमीच दारू पिऊन यायचे, घरी भांडण करायचे. त्यांना दोन्ही डोळ्यांनी कमी दिसत होते, त्यामुळे त्यांच्या सांभाळ कुणी करायचा ? वडीलांचा कंटाळा आल्याने खून केल्याची कबुली त्यांच्या दोन्ही मुलांनी दिली. खून करण्यास मदत करणारी सून, मोठ्या मुलाचा मित्र या दोघांविरोधातही गुरूवारी (दि. २०) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१९ ) दोन्ही मुलांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेत आता एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दशरथ सुखदेव माळी ( वय ६०, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांचा खून केल्याच्या संशयावरून पोलिसांनी मोठा मुलगा रामदास दशरथ माळी ( वय २५) व लहान मुलगा अमोल दशरथ माळी ( वय १८) ( दोघेही रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या दोघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दशरथ माळी यांचा खून १५ मे रात्री दहा ते १६ मे सकाळी सातच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चिखली येथे झाला होता. त्यांची दोन्ही मुले चिखली येथे वीटभट्टीवर काम करत होते. दशरथ माळी यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. माळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले करत होत्या. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता त्यात दशरथ माळी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तपासी अधिकारी महाले यांना संशय वाटल्याने त्यांनी मयत माळी यांच्या दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रामदास व अमोल माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही मुलांनी वडिलांचा खून केल्याची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी महाले यांनी सांगितले. दशरथ माळी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी करण्यात आले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मोठा मुलगा रामदास व त्याची पत्नी सविता माळी (वय २३) व त्याचा मित्र अंकुश लोखंडे (वय २३,रा. चिखली, ता. संगमनेर) या दोघांचाही या खुनाच्या घटनेत सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर