कोपरगाव : फटाके वाजविण्यास मज्जाव केल्याच्या रागातुन अज्ञात आरोपींनी शहरातील सराफ गल्लीत लावलेली दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोवीस तासात तिघा जणांना अटक केली आहे.पोलिसांची माहिती अशी, शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी संदीप कानकुब्जी यांची होंडा पॅशन प्रो कंपनीची दुचाकी जाळल्याचा प्रकार सराफ बाजारातील जैन मंदिराजवळ घडला. याप्रकरणी कानकुब्जी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासाचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. दरम्यान शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील शिर्डी व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.वाय.कादरी वेगाने तपासचक्रे फिरविले. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित आढळलेल्या करण उर्फ मोनू प्रकाश दळवी (वय २४), रोहित उर्फ रिंकू बाळासाहेब खडांगळे (रा. पांडे गल्ली) व अमोल बाळासाहेब देवकर यांना पोलिसांनी चोवीस तासात अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना कानकुब्जी यांनी काही दिवसांपुर्वी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात फटाके वाजविण्यास मज्जाव केला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोपरगावात दुचाकी जाळणा-या तिघा जणांना अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:54 IST