शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांसह तिघा परिचारिकांना अटक; नगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 07:48 IST

अग्निकांडप्रकरणी लोकमतने प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनाविरोधात सवाल उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

नगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी आग लागून ११ कोरोना रुग्णांचा बळी गेल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अग्निकांडप्रकरणी लोकमतने प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनाविरोधात सवाल उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात  आले आहे, तर शेख आणि अनंत  यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या निलंबनासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली. 

घटनेच्या दिवशीच अज्ञात आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची तीव्रता लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जळालेल्या कक्षाची संपूर्ण पाहणी केली होती.

परिचारिकांची निदर्शने

निलंबित तीन परिचारिकांवरील कारवाई त्वरित मागे घ्यावी, अन्यथा सर्वांचे निलंबन करावे, अशी मागणी करत मंगळवारी सकाळी परिचारिकांनी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने केली. राज्यातही काही ठिकाणी परिचारिकांनी निदर्शने केली. परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे परिचारिकांच्या संघटनेने निषेध नोंदविला आहे. प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणीही पुढे येत आहे.

‘फायर ऑडिट’च्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झाले नव्हते. महापालिकेने केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या होत्या. त्याची पूर्तता करण्यात जिल्हा रुग्णालयाने टाळाटाळ केली. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, यावर ‘लोकमत’ने पहिल्याच दिवशी प्रकाश टाकला होता.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर