शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

तीन आमदार दिवा स्वप्नच

By admin | Updated: October 23, 2014 14:56 IST

नगर तालुक्यातून तीन आमदार होण्याचे स्वप्न नगर तालुक्यातील राजकीय अस्मितेच्या अभावामुळे धुळीला मिळाले आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातून तीन आमदार होण्याचे स्वप्न नगर तालुक्यातील राजकीय अस्मितेच्या अभावामुळे धुळीला मिळाले आहे. तालुक्यातील राजकीय अस्मितेची या निवडणुाकीत ऐसी-तैशी झाल्याने नगर तालुक्यातील ४६ टक्के मते दुसर्‍या तालुक्यातील उमेदवारांच्या पदरात टाकल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्डिले यांच्या माध्यमातून एकच आमदार या तालुक्याला मिळू शकला.

नगर तालुक्याचे त्रिभाजन झाल्यानंतर झालेल्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेचे शशिकांत गाडे यांनी o्रीगोंदय़ातून तर माधवराव लामखडे यांनी पारनेर मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यामुळे तालुक्यातील मतदार तालुक्याची अस्मिता म्हणून एक येतील व तालुक्यातील उमेदवारालाच एकगठ्ठा मतदान करतील, असे चर्वितचर्वण या निवडणुकीत चांगलेच चर्चेला आले. तीन आमदार मिळण्याचे स्वप्नही तालुक्याने बाळगले खरे पण कर्डिले यांचा अपवाद वगळता गाडे, लामखडे यांना तालुक्यातील जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्याची अस्मिता म्हणून मतदार पाठिशी राहतील हे गृहीत धरून गाडे यांनी o्रीगोंदय़ातून व लामखडे यांनी पारनेमधून दंड थोपटले. पण घरच्या मैदानावरच त्यांची निराशा झाली. 
गाडे यांना नगर तालुक्यातून फक्त ३६ टक्के, लामखडे यांना ४६ टक्के मते मिळाली. कर्डिले यांनी तालुक्यातील ७२ टक्के मते मिळविली. तालुक्यातील एकूण मतांपैकी ४६ टक्के मते तालुका बाहेरील उमेदवारांना मिळाल्याने तालुका अस्तितेचा फुगा फटला.(तालुका प्रतिनिधी) 
■ गाडे, लामखडे, यांची घरच्या मैदानावरच निराशा झाली असली तरी आ. कर्डिले यांना होम ग्राऊंड ने मोठी साथ दिली तालुक्यातील इतर दोन उमेदवार असताना ही त्यांनी ७२ मिळवली ३३२७0 मतापैकी त्यांनी २४ हजार मते मिळवली अमोल जाधव, गोविंद मोकाटे या तालुक्यातील उमेदवारांनी तालुक्यातुन केवळ १३00 मते मिळवली डॉ.उषाताई तनपुरे ५ हजार ७१५ मते घेऊन तालुक्यात दुसर्‍या क्रमांकावर राहिल्या
 ■ नगर तालुक्यातील निंबळक, आरणगाव व देहरे गटातील मतांच्या जिवावर आमदार व्हायला निघालेल्या लामखडेंना तालुक्यातील फक्त ४६ टक्के मतदारांनीच पसंती दिली. लामखडे यांनी तालुक्यातुन केवळ १0 हजार ४0५ मतांची आघाडी घेतली. आ.विजय औटी यांचा प्रभाव कमी करण्यास त्यांचे प्रयत्न एकाकी पडले बाबासाहेब तांबे, सुजीत झावरे, औटी यांनी तालुक्यातील ५४ टक्के मिळवली औटी यांच्या पेक्षा लामखडे यांनी तालुक्यातुन साडे दहा हजार मते जास्त मिळवली. 
■ श्रीगोंदा मतदार संघात नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गट व वाळकी गटातून ४६,000 मते होती. यातील दोन्ही गटामुधुन गोडेंना फक्त १६ हजार मते तर राहुल जगताप यांना १४ हजार मते आणि बबनराव पाचपुते यांना १३ हजार मते मिळाली. यात चिचोंडी पाटील गटातुन गाडेंना अवधी दोन हजार मतांची आघाडी तर वाकळी गटातुन गाडे जगताप यांच्या पेक्षा दिड हजार मतांनी पिछाडीवर राहिले गाडे व पाचपुते हे वाळकी गटातुन जवळपास बरोबरीनेच राहिले वाळकी व गुंडेगाव येथील काँग्रेस कर्याकर्त्यांनी उघडपणे काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी गुंडेगाव मधुन पाचपुतेंना आघाडी मिळाली वाळकी गावातुन जगताप यांना आघाडी मिळाली. जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ तटस्थ दिसत असले तरी त्यांच्या कार्यंकर्त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचे उघड झाले. नगर तालुक्यातुन गाडेंना फक्त २ हजार मतांची आघडी मिळाली.