शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 16:03 IST

जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. 

जामखेड : शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. जामखेड शहरातील संताजीनगर येथे रहात असलेले आडत व्यापारी रमेश जरे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. २६ आॅक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूकडील असलेला दरवाजाचे सेफ्टी लॉक कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी सामानाची उचकापाचक करून घरातील कपाटात असलेले रोख दोन लाख दहा हजार व साडे सात तोळे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले. यावेळी चोरट्यांनी आसपासच्या घराला कडी लावली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने अर्धा किलोमीटरपर्यंत मार्ग दाखवला. त्यानंतर ते परत फिरले. जामखेड पोलिसांनी याबाबत फियार्दी रमेश जरे यांच्या तक्रारीवरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत. 

टॅग्स :Jamkhedजामखेडtheftचोरी