शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

ट्रक- दुचाकी अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघे ठार

By सचिन धर्मापुरीकर | Updated: September 15, 2023 20:01 IST

कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारातील घटना

कोपरगाव (जि.अहमदनगर)  : तालुक्यातील खेर्डी गणेश शिवारात नगर- मनमाड महामार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. या अपघातात पुरुष महिला व एक दीड वर्षीय मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नगर मनमाड रस्त्यावर कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारात शुक्रवार (दि.१५) रोजी दुपारी चारच्या सुमारास ट्रक आर. जे. १४ जी. जे. ३४६८ व दुचाकी एमएच ४१ जे. २४५१ यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला व दीड वर्षाची मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली. हे तिघेही पती-पत्नी व मुलगी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी, रमेश झाडे यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ट्रकचालक तेथून फरार झालेला होता. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेतला आहे. दूचाकी वरील नंबर प्लेटवर अश्विन असे नाव लिहिलेले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरDeathमृत्यू