शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 20:37 IST

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते.

अहमदनगर/रुईछत्तीसी : नगर-सोलापूर रोडवरील रुईछत्तीसीजवळ असलेल्या अंबिलवाडी  (ता. नगर) येथे झायलो व एसटी़ बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. या अपघातात अरुण बाबुराव फुलसौंदर (वय ६०) ताराबाई शंकरराव भगत (५८ रा. दोघे बुरुडगाव रोड, नगर) व अर्जुन योगेश भगत (वय ८ रा़भगतमळा, सिव्हिल हडको, नगर) यांचा मृत्यू झाला असून आरती योगेश भगत, रत्नमाला अरुण फुलसौंदर, शंकर भगत व कृष्णा भगत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फुलसौंदर व भगत कुटुंबीय शनिवारी झायलो जीपमधून नगर-सोलापूर रोडमार्गे पंढरपूरला जात होते.  झायलो अंबिलवाडी परिसरातून जात असताना राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते मालेगाव ही बस समोरून येत होती.  या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  हा अपघात इतका भीषण होता की, यात झायलो जीपचा पूर्णत: चक्काचूर झाला. एसटी बसची पुढील एक बाजूही पूर्णपणे आत गेली.  या घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.  या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी झायलोत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रस्ता नव्हे मृत्युचा सापळा नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खराब रस्त्यामुळे दरेवाडी ते मिरजगावपर्यंत वारंवार छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. रुईछत्तीसी व अंबिलवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा बळी गेला आहे. नगर-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ खराब रस्त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. -रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य, नगर तालुका.नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेकांनी जीव गमविला आहे. प्रशासन अजून किती मृत्युची वाट पाहणार आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.- संतोष म्हस्के, संचालक, बाजार समिती.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर