पाथर्डी/तिसगाव : कल्याण विशाखापट्टणम् महामार्गावरील नगर-तिसगांव रस्त्यावर गुरुवारी दुपारी चार वाजता कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. तिसगांव येथील पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला.पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन विश्वास नेव्हूल (वय ४१,रा.जवखेड दुमाला), जालींदर सावळेराम आठरे (वय ५८), मनाबाई लक्ष्मण सावंत (वय ५५) हे दोघे भाऊ-बहीण (रा.कौठगाव आठरे, ता.पाथर्डी) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. नितीन विश्वास नेव्हूल हे पत्नी शितल आणि मुली मोनाली व सायली आणि मुलगा चैतन्य यांच्यासह इन्होव्हा कारने पुण्यावरून जवखेडे दुमाला (ता. पाथर्डी) येथे येत होते. जालींदर सावळेराम आठरे व त्यांची बहीण मनाबाई सावंत हे अॅक्टीव्हा या दुचाकीवरून तिसगांवकडून कौंडगाव आठरे या गावाकडे जात होते. तिसगांव पेट्रोलपंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची घडक झाली.
कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार
By admin | Updated: April 1, 2016 00:52 IST