शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नगरपालिकेच्या तीन कर्मचा-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:58 IST

उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचा-यांना मारहाण झाल्याची घटना शहरातील हनुमान नगरमध्ये बुधवारी रात्री घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. 

ठळक मुद्देकोपरगावातील प्रकारशहर पोलीस ठाण्यावर मोर्चा 

कोपरगाव : उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचा-यांना मारहाण झाल्याची घटना शहरातील हनुमान नगरमध्ये बुधवारी रात्री घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. भारत स्वच्छता अभियानांतर्गत उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिकेने आर.एम.शिंगाडे, प्रशांत उपाध्ये, कैलास आढाव, गणी पठाण, रणजित डाके, संजय कसाब, मधुकर  वाल्हेकर, विजय लोंढे, केशव राखपसारे व जयश्री घाटे या १० कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. त्यापैकी काही कर्मचारी बुधवारी रात्री हनुमाननगर भागात उघड्यावर बसणाºयांना शिट्ट्या वाजवून प्रतिबंध करीत होते. गिरमे वस्तीजवळ नितीन पवार यांच्यासह इतर काहींनी मुकादम गणी पठाण, संजय कसाब व रणजित डाके यांना मारहाण केली. त्यात कसाब यांचा हात तुटला. तर डाके यांना तोंड व छातीला जबर मार लागून ते जखमी झाले. या प्रकाराने पालिका कर्मचारी संतप्त झाले. संतप्त झालेल्या नगरपालिका कर्मचा-यांनी गुरुवारी दुपारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन पवार यांच्यासह मारहाण करणारांवर कारवाई करण्याची मागणी केली. मोर्चेक-यांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष सोपान शिंदे, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल चव्हाण, राजू लोंढे, दशरथ राखपसारे, प्रल्हाद साबळे, विनोद डाके, आनंद वाल्हेकर, पवन हाडा, रणधीर तांबे, योगेश साळवे, बलराज चावरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.