शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 21:27 IST

वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 अहमदनगर - वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी शिवारात रविवार संध्याकाळच्या सुमारास घडली.  दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह चार तास जागीच पडून होते.याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, रविवारी एक तरुण आईला खडकवाडी येथे दवाखान्यात उपचारासाठी आणून उपचारानंतर नागापूरवाडी(पळशी)घराकडे परतत होता. त्यांना रस्त्यात एक वृद्ध महिला वारकरी भेटली असता तिला पण त्यांनी मोटारसायकलवर बसवले.  दरम्यान, खडकवाडी शिवारात अवघ्या दोन कि.मी.वर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या बिगरनंबरच्या वाळूच्या डंपरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. त्यानंतर  हा डंपर अंगावरून गेल्याने दुचाकीवरील तिघाही जणांचा जागीच मृत्यू झाला.   या मृतांमध्ये गोरक्ष कोंडीभाऊ मेंगाळ (४०), त्यांची आई बुधाबाई कोंडीभाऊ मेंगाळ  (६८)  दोघे रा.नागापूरवाडी(पळशी),  तर कामटवाडी येथून अखंड हरिनाम सप्ताह आटोपून वनकुटे परतत असलेल्या  वृध्द वारकरी महिला सुमनबाई पंढरीनाथ डंबे (७५) रा.वनकुटे,ता.पारनेर यांचा सामावेश आहे.घटना घडल्यानंतर नागापूर (पळशी) व खडकवाडी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू करून जोपर्यंत तहसीलदार,प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षक येत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही असा पावित्रा घेतला. त्यामुळे परिसरात वाळू तस्करांविरोधात वातावरण  तापले होते. दरम्यान, तीन तासांनी पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोथरे व बालाजी पदमने घटनास्थळी आले. जोपर्यंत आरोपीला पकडत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा पावित्रा स्थानिकांनी घेतल्याने पोलिसांनाही वरिष्ठांशी संपर्क केला. मात्र तब्बल चार तासानंतर तहसीलदार गणेश मरकड घटनास्थळी पोहोचले.  

टॅग्स :Accidentअपघात