शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 09:43 IST

पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा : (जि. अहमदनगर) : पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

 ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतीष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५)  या युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी घोड नदीतिरी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक समजलेली माहिती अशी की,  मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून जात असताना समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटरला धडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना इतरांना दिसून येत नाहीत.  त्यामुळे असे  अपघात होऊन आतापर्यत तालुक्यातही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.  

गेल्या वर्षी श्रीगोंदा व काष्टी येथील तीन तरुणांचा श्रीगोंदा शहरातील काष्टी ते श्रीगोंदा महामार्गावर असाच अपघात होऊन मृत्यू झाला होता. प्रशासन व कारखानदार यांनी  निष्पाप लोकांचे जीव जाण्याची वाट पहात न बसता या विनारिफ्लेकटर प्रवास करणाऱ्या वाहनांबाबत कडक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघात