शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 13:31 IST

एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे.

अहमदनगर : एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. सद्यस्थितीत टँकरने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून तब्बल ७३२ टँकरने ११ लाखांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदाच्या तीव्र दुष्काळात सर्वांचीच लाहीलाही होत असून पाणीटंचाईने नागरिक घायाळ झाले आहेत. भूजलपातळी खालावल्याने गावोगावच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणी योजनाही बंद पडल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू झाली.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीपासून टँकर सुरू केले.आजमितीस ४८३ गावे व २ हजार ७२२ वाड्यांमधील सुमारे ११ लाख २६ हजार लोकसंख्येला तब्बल ७३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१३च्या दुष्काळी स्थितीत टँकरचा आकडा ७३२ होता. तो आकडाही आता मागे पडला आहे. अजून मे व जून असे दोन महिने जायचे आहेत. त्यामुळे टँकरचा आकडा हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.माणसी २० लिटर पाणी टँकरद्वारे दिले जाते. तेच पाणी जपून वापरण्याचे आव्हान लोकांपुढे आहे. सुदैवाने जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. प्रशासनाने आणखी खेपा वाढवून द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.सर्वाधिक १५२ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू असून त्यानंतर पारनेर (१३७), शेवगाव (५९), संगमनेर (५३) येथेही टँकरची संख्या अधिक आहे.तालुकानिहाय टँकरची संख्यासंगमनेर 53अकोले 6कोपरगाव 10राहुरी 1नेवासा 26राहाता 4नगर 58पारनेर 137पाथर्डी 152शेवगाव 59कर्जत 91जामखेड 89श्रीगोंदा 46

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय