शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील महालक्ष्मी मंदिरातील २५ लाखांचे दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांनी 'असा' आवळला कारवाईचा फास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 20:25 IST

आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी लोणी मार्गे अहिल्यानगरला येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती.

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरील चोरलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी अहिल्यानगरकडे येत असलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम, (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय २४, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), सचिन दामोदर मंडलिक (वय २९, रा. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात शनिवारी (दि. ८) चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर असे एकूण २४ लाख ९४ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास हाती घेत गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषणात सुयोग अशोक दवंगे याचे नाव समोर आले. त्याचा शोध घेत असताना आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी लोणी मार्गे अहिल्यानगरला येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पथकाने लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी पाठलाग करत सहाही आरोपींना दागिन्यांसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक निरीक्षक हेमंत थोरात, सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदीच्या पथकाने केली. संगमनेर पोलिसांची भूमिका संशयास्पदकाकडवाडी हे गाव संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तेथील महालक्ष्मी माता मंदिरात ८ मार्च रोजी चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संगमनेर पोलिस मात्र हातावर हात धरून बसले. त्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी