शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:45 IST

अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात : विखे कारखान्यासाठी ९ ला, तर थोरातसाठी ११ मे रोजी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. विखे कारखान्यासाठी ९, तर थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी मतदान होणार आहे. विखे कारखानाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज सायंकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ ते ९ एप्रिलदरम्यान मुदत असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारीला, तर अंतिम मतदार यादी १९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासोबतच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचीही निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३ एप्रिलपासून विखे पाटील कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ९ एप्रिल असून, ९ मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील दोन्ही प्रबळ नेत्यांच्या अधिपत्याखालील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार बाळासाहेब थोरात हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीत हा विरोध आणखी तीव्र झाला होता. त्याची झलक साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका चांगल्याच गाजण्याची शक्यता आहे.

‘थोरात’च्या २१ जागांसाठी निवडणूकसर्वसाधारण गटाच्या मतदारसंघ क्रमांक एकमध्ये गट क्रमांक १ ते ५ मध्ये १५ प्रतिनिधी, मतदारसंघ क्रमांक दोनमध्ये उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १ प्रतिनिधी, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघात १ प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्ग मतदारसंघात एक प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात एक, अशा एकूण २१ जागा आहेत. निवडणुकीकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धीरज मांजरे यांची नियुक्ती केली आहे.

थोरात कारखान्याचा असा आहे निवडणूक कार्यक्रम- अर्ज दाखल करणे : ३ ते ९ एप्रिलदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत.- प्राप्त अर्ज प्रसिद्ध करणे : ३ ते ९ एप्रिलदरम्यान (दुपारी ४ वाजता).अर्जांची छाननी : ११ एप्रिल सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत.-विधिग्राह्य अर्जांची सूची प्रसिद्ध करणे : १५ एप्रिल सकाळी ११ वा.- अर्ज माघार : १५ ते २९ एप्रिल सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत.

- अर्जांची यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप : २ मे रोजी सकाळी ११ वा.

-मतदानाची तारीख व वेळ : ११ मे सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल.)-मतमोजणी : १२ मे सकाळी ९ वाजेनंतर (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल.)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024