शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसातशे अंगणवाड्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:37 IST

शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

अहमदनगर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़उन्हाळा सुरू असल्याने शाळांना सध्या सुट्या आहेत़ मात्र, अंगणवाड्या सुरू आहेत़ सकाळी ८ ते दुपारी १, यावेळेत अंगणवाड्यात भरतात़ जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ८०१ इतकी आहे़ उन्हाळा असल्याने अंगणवाड्यांमध्येच पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे़ मात्र जिल्ह्यातील ७६९ अंगणवाड्यांमध्ये कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ राहुरी तालुक्यातील सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ गावातील ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळतो़ या निधीतून गावात पायाभूत सुविधा पुरविल्या जातात़ मात्र गावातील शाळा व अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते़गावातील शाळांना स्वतंत्र नळजोड आहेत़ अंगणवाडीला मात्र अशी कुठलीही सुविधा नाही़ त्यात अंगणवाड्या उन्हाळ्यात सुरू असतात़ असे असतानाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने चिमुकल्यांची गैरसोय होत आहे़अंगणवाड्यांना जलशुध्दीकरण यंत्रांचाही पुरवठा करण्यात आला आहे़ मात्र काही ठिकाणी अंगणवाड्यांना सुविधा मिळत नसल्याने चिमुकल्यांची मोठी गैरसोय होत आहे़शंभर टक्के पाणीपुरवठासंगमनेर, शेवगाव, नगर, पारनेर, बेलवंडी आणि राहाता प्रकल्पातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे़पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे़ कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - मनोज ससे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

सर्वाधिक संख्या राहुरीतराहुरी प्रकल्पात सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ त्याखालोखालवडाळा............... (१४४)कर्जत ............... (८४)जामखेड ............... (८२)भिंगार ............... (६२)श्रीरामपूर............... (५७)कोपरगाव ............... (४७)नेवासा ............... (३२)राजूर ............... (३०)अकोले ............... (२७)पाथर्डी ............... (२१)श्रीगोंदा............... (२०)घारगाव ............... (१६)येथील अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नाही़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा