जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या ४१७ जागांसाठी १ हजार ३०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या दिवशी ७१९ अर्ज दाखल झाले. गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज : अरणगाव ५२, मोहा ४५, साकत ४९, जवळके २१, सोनेगाव १७, घोडेगाव ३६, बोर्ले २४, चोंडी ४२, धानोरा ३६, मोहरी १८, सावरगाव १४, पिंपळगाव आळवा २४, खांडवी २५, बावी १७, कवडगाव ३०, डोणगाव ३०, नाहुली २७, पिंपळगाव उंडा १५, गुरेवाडी १४, पिंपरखेड ५७, धामणगाव ३१, दिघोळ ४०, बाळगव्हाण १४, आनंदवाडी १६, धोंडपारगाव १४, लोणी २१, कुसडगाव २८, तरडगाव २२, सातेफळ १४, पाटोदा ५०, बांधखडक २४, नायगाव २३, तेलंगशी २८, नान्नज ४५, खर्डा १०१, पाडळी २२, खुरदैठन ७, चोभेवाडी १८, पोतेवाडी ७, राजेवाडी १०, वाघा २०, आपटी ७, सारोळा ९, वाकी ९, आघी १८, झिक्री १५, देवदैठन ३३.
-----
८५ वर्षीय आजीबाईंचाही अर्ज..
घोडेगाव येथील ८५ वर्षीय हौसाबाई रासकर यांनीही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यापूर्वी त्यांनी १९९० साली ग्रामपंचायतीला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांचा १५ मतांनी पराभव झाला होता. आता त्या पुन्हा नशीब अजमावीत आहेत.